पावसाकडे प्रत्येक कवी कसा वेगवेगळ्या सुंदर नजरेने पाहतो आणि कविता प्रत्येक पिढीनुसार कशी तरुण होते पहा……
( अर्थात तुलना करणे असा हेतू अजिबात नाहीये.. )
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;
नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?
- इंदिरा संत
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही,
आम्ही आसवांनी शेते भिजवली..
- यशवंत मनोहर
ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।
मेघ कसे बघ गडगड करिती ।
विजा नभांतुन मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे ।।
- वंदना विटणकर
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।
- शांताबाई शेळके
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
- मंगेश पाडगांवकर
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले । घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।
पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी …….
- ना . धों . महानोर .
ढग दाटून येईल,
झाड नवीन होईल..
- अरुणाताई ढेरे
मोकळा उदासीन वारा,
नभ भरून आले वरती,
गाण्याच्या जन्मासाठी,
अन मनात भिजते माती..
- अरुणाताई ढेरे
आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।
- सुधीर मोघे
नाही कधी का तुम्हास म्हटलं,
दोष ना द्यावा फुका ।अन् राया मला, पावसात नेऊ नका ।।
लई गार हा झोंबे वारा ।अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।भिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका ।।
अन् राया मला, पावसात नेऊ नका ॥ . -( लावणी )- वसंत सबनीस .
थेंबांना सावरलेल्या,
त्या गवताच्या काडांचा,
पाऊस पडून गेल्यावर,
मी भिजलेल्या झाडांचा..
- किशोर कदम
( अर्थात तुलना करणे असा हेतू अजिबात नाहीये.. )
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;
नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?
- इंदिरा संत
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही,
आम्ही आसवांनी शेते भिजवली..
- यशवंत मनोहर
ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।
मेघ कसे बघ गडगड करिती ।
विजा नभांतुन मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे ।।
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।
- शांताबाई शेळके
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
- मंगेश पाडगांवकर
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले । घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।
पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी …….
- ना . धों . महानोर .
ढग दाटून येईल,
झाड नवीन होईल..
- अरुणाताई ढेरे
मोकळा उदासीन वारा,
नभ भरून आले वरती,
गाण्याच्या जन्मासाठी,
अन मनात भिजते माती..
- अरुणाताई ढेरे
आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।
- सुधीर मोघे
नाही कधी का तुम्हास म्हटलं,
दोष ना द्यावा फुका ।अन् राया मला, पावसात नेऊ नका ।।
लई गार हा झोंबे वारा ।अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।भिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका ।।
अन् राया मला, पावसात नेऊ नका ॥ . -( लावणी )- वसंत सबनीस .
थेंबांना सावरलेल्या,
त्या गवताच्या काडांचा,
पाऊस पडून गेल्यावर,
मी भिजलेल्या झाडांचा..
- किशोर कदम
No comments:
Post a Comment